फुटबॉलमधली अनोखी “#मी टू’ चळवळ

फुटबॉल हा खेळ निस्सीम भावनांचे प्रकटीकरण करणारा खेळ आहे. प्रेम, अल्लडता, आपलेपण त्याचबरोबर विरोध, द्वेष, विश्वासघात, अपराधीपणा या भावनांचे प्रकटीकरण होताना देखील आपण फुटबॉलच्या माध्यमातून पहिले आहे. त्याचबरोबर देशवासीयांचे प्रश्न, कट्टरपंथीयांची बाजू आणि विस्थापितांचे प्रश्न फुटबॉलच्या माध्यमातून अनेकदा समोर आले आहेत. जर्मन फुटबॉल सध्या अनेक अंतर्गत वादांमुळे प्रकाशझोतात आहे. ते रशिया येथील विश्वचषकात विजयाचे प्रबळ दावेदार असताना गट साखळीतच गारद झाले. त्यानंतर त्यांचा संघातील महत्वाचा खेळाडू मेसूत ओझील याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. ही निवृत्ती त्याने जर त्याचे वय आणि खेळातील घसरण यामुळे घेतली असती तर वेगळी गोष्ट होती. परंतु पाच वर्षे “जर्मन प्लेयर ऑफ द ईअर’ या पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या ओझीलने “वंशद्वेष’ या गंभीर बाबीमुracismळे निवृत्ती घेतल्याने खूप चर्चा होत आहे. यामध्ये अनेकजण त्याच्या बाजूने उभे आहेत आणि त्याचे समर्थन करीत आहेत.

तुर्कीश वंशाचा आणि जर्मन नागरिक असणाऱ्या ओझीलला जर्मनीच्या पराभवासाठी जबाबदार ठरवण्यात आले. त्यासाठी त्याच्या खेळाला लक्ष्य न करता त्याच्या आणि तुर्कीच्या राष्ट्राध्यक्ष गुर्दोन यांच्यासोबतच्या विश्वचषकापूर्वीच्या भेटीसाठी आणि त्याच्या तुर्कीश वंशाच्या कारणांसाठी त्याला लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या ओझीलने निवृत्तीची घोषणा केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ओझील म्हणतो,”आम्ही जेव्हा जिंकतो तेव्हा जर्मन आणि जेव्हा हरतो तेव्हा

‘विस्थापीत’ हा फरक चुकीचा आहे. त्याच्या निवृत्तीनंतर अनेक विस्थापित लोक पुढे आले आणि त्याला समर्थन देऊ लागले. त्यातीलच एक म्हणजे जर्मन-तुर्कीश लेखक, कार्यकर्ते अली कान. कान यांनी यासाठी ट्‌वीटरवर “#मी दोन’ (# ME TWO) ही मोहीम चालवली. त्यामुळे जर्मनीमधील विस्थापिताच्या दुसऱ्या पिढीतील अनेकांनी आपले अनुभव सर्वांसमोर मांडले.

“# मी टू’ असे नाव का म्हणाल तर अली कान यांनी याबाबत सांगितले की, “दोन देश’ यात असल्याने आम्ही याला “#मी टू’ असे नाव दिले. हॉलीवूडमध्ये लैंगिक अत्याचाराविरुद्ध देखील मोहीम चालू आहे. ती मोहीम #ME TOO अशी आहे. विस्थापितांचे प्रश्न हे फुटबॉलमध्ये नवे नाहीत. ते फ्रान्स, स्विर्त्झलॅंड, बेल्जियम अश्‍या अनेक देशांसाठी मोठे आहेत. फ्रान्सचा करीम बेन्जीमा, बेल्जियमचा रोमेलू लुकाकू, स्विर्त्झलॅंडचे शकिरी आणि झ्हाका यांनी अनेकदा पुढे मांडलेले आहे. परंतु जो वाद ओझीलच्या बाबतीत झाला आणि त्याला जे चळवळीचे स्वरूप आले आहे ते खूप मोठे आहे.

– राजकुमार ढगे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)