फुटबॉल स्पर्धा: विबग्योर स्कूल, आर्यन स्कूल, बिशप्स हायस्कूल संघांचा उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश 

ग्रीनबॉक्‍स आंतरशालेय 12 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा 

पुणे: ग्रीनबॉक्‍स यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विबग्योर स्कूल अ आणि ब संघ, आर्यन स्कूल, बिशप्स हायस्कूल (कॅम्प) या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून ग्रीनबॉक्‍स 12 वर्षांखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील उपउपान्त्यपूर्व फेरीत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॅस्टल रॉयल, एबीआयएल कॅम्पस, रेंजहिल्स, भोसलेनगर येथील फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपउपान्त्यपूर्व फेरीच्या संघर्षपूर्ण लढतीत आर्यन स्कूल संघाने हचिंग्ज हायस्कूल संघाचा 4-3 असा पराभव करून आगेकूच केली. निर्धारित वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत सुटला व त्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये आर्यन स्कूलकडून नीलय देशप्रभू व अवनीश पाटील यांनी गोल केले. तर हचिंग्ज हायस्कूलकडून राज पुंगलियाने एकमेव गोल केला. सक्षम गिंडे, जीवल गुंदेशा यांना गोल करण्यात अपयश आले. 

अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात आरिन देशमुख (10 व 15वे मि.) याने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर विबग्योर स्कूल ब संघाने विद्या भवन ब संघाचा 4-2 असा पराभव करून आगेकूच केली. आयुष खातंहर (3, 4, 9 व 16वे मि.) याने केलेल्या चार गोलच्या जोरावर विबग्योर स्कूल अ संघाने स्प्रिंग डेल अ संघाचा 7-0 असा धुव्वा उडवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. सिद्धांत जाधव व आरुष शहा यांनी प्रत्येकी एक गोल करताना त्याला साथ दिली. 

आणखी एका एकतर्फी लढतीत बिशप्स हायस्कूल (कॅम्प) संघाने विद्या भवन अ संघाचा 5-0 असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून जय मदनने (12 व 13वे मि.) आणि आरव अब्राहम (18 व 22वे मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. यश मुथाने एक गोल करीत त्यांना सुरेख साथ दिली. 

सविस्तर निकाल- 

उपउपान्त्यपूर्व फेरी – आर्यन स्कूल- 4 (नीलय देशप्रभू पहिले मि., अवनीश पाटील 11वे मि., नीलय देशप्रभू, अवनीश पाटील, गोल चुकविले- अभिषेक जाधव) टायब्रेकरमध्ये वि.वि.हचिंग्ज हायस्कूल- 3 (जीवल गुंदेशा 14वे मि., सुचिर दुर्गवज्जाला 24वे मि., राज पुंगलिया, गोल चुकविले: सक्षम गिंडे, जीवल गुंदेशा); पूर्ण वेळ: 2-2; विबग्योर स्कूल ब- 4 (आरिन देशमुख 10 व 15वे मि., वैभव राजेश 17वे मि., गौरव गिरीश 18वे मि.) वि.वि. विद्या भवन ब- 2 (अंकित गवारे पहिले मि. ऍरॉन मेंडीस चौथे मि.) बिशप्स हायस्कूल (कॅम्प)- 5 (यश मुथा सहावे मि., जय मदन 12 व 13वे मि., आरव अब्राहम 18 व 22वे मि.) वि.वि. विद्या भवन अ- 0; विबग्योर स्कूल अ- 7 (आयुष खातंहर 3, 4, 9 व 16वे मि., सिद्धांत जाधव 12वे मि., आरुष शहा 17 व 18वे मि.) वि.वि. स्प्रिंग डेल अ- 0. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)