उदयसिंह पाटील यांच्या पाठिशी राहा : काटकर

कराड –रयत संघटनेचे नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी कराड दक्षिण मतदार संघाचा सर्वांगिण विकास केला आहे. जिथे कुसळ उगवत नव्हते तेथे मुसळा एवढा ऊस तयार झाला, ही किमया फक्त विलासराव काका यांचीच आहे. यामुळे भविष्यात या विभागाचा विकास करायचा असेल तर युवा नेते ऍड. उदयसिंह पाटील हे कराड दक्षिणची निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या पाठीशी या विभागातील जनतेने ठामपणे उभे राहावे, असे आवाहन रयत संघटनेचे नेते प्रा. धनाजी काटकर यांनी केले.

सभापती आपले दारी या संपर्क अभियानात विठ्ठलवाडी, ता. कराड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच सौरभ भणगे, लक्ष्मण यादव, शिवाजी करांडे, कोयना दूध संघाचे संचालक अधिकराव जगताप, तानाजीराव शेवाळे, काशिनाथ कारंडे, मोहन थोरात उपस्थित होते. प्रा. धनाजी काटकर म्हणाले, गेल्या 35 वर्षांत विलासकाकांनी डोंगरी भागाचा सर्वांगिण विकास केला आहे. प्रत्येक गावात धरणे बांधून वाड्या-वस्त्यांवर पाण्याची उपलब्धता करुन बागायती क्षेत्र बनवले. त्यामुळे जनतेने आमिषाला बळी न पडता उदयसिंहांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी. प्रास्ताविक सरपंच सुरज भणगे यांनी केले. आभार गुलाबराव चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास रघुनाथ पाटील, संजय वीर, रामभाऊ माने, अरुण चव्हाण, भास्कर खोत, बापूराव चव्हाण, सुनील कराडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)