सातारा – अन्न व औषध प्रशासनाने दीपचंद प्रतापचंद जैन यांच्या मे. डायमंड कंपनीची (शाहबाग फाटा) आज अचानक तपासणी केली असता नियम मोडून हळद पावडर विकत असल्यामुळे कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.
या व्यापा-याकडून छापलेल्या बॅगवर उत्पादकाचा दिनांक, बॅच नंबर, तसेच उत्पादकाचा पत्ता नसल्याचे आढळून आले. या लेबलवर सेलम सांगली असे उल्लेखित करुन ही हळद पावडर सांगली येथील असल्याचे भासविले जात असल्याचे आढळून आल्यामुळे 16 लाख 99 हजार 600 रुपये किमतीचा 16 हजार 996 किला चा साठा जप्त करण्यात आला.
संदीप सुरेशराव कोरडे यांच्या मे. कोहिनूर स्टॉल (शाहबाग फाटा) येथे तपासणी केली असता हळद पावडरच्या लेबलवर चुकीचा नोंदणी क्रमांक नमूद असल्याने तसेच मिरची पावडर व कांदा लसूण मसाला या अन्न पदार्थाच्या पॅकेटवर लेबल नसल्याचे आढळून आल्याने 59 हजार 460 रुपये किमतीचा 382 किला साठा जप्त केलो.
तसेच येथील इतर 10 अन्न व्यावसायिकांची तपासणी करुन अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमावलीचे पालन करुन अन्न पदार्थाची विक्री करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. ही कारवाई पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनौली सहायक आयुक्त (अन्न) शिवकुमार कोडगिरे यांच्या पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, रोहन शहा, युवराज ढेंबरे, विकास सोनवणे, नमुना सहाय्यक सुनील सर्वगोड यांनी केली.