फुलांना किलोमागे एक रुपया भाव!

संपप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच फेकली फुले 

नगर –शेतकऱ्यांनी अतिशय मेहनतीने काळ्या मातीत पिकवलेल्या झेंडू, शेवंतीच्या फुलांना एक रुपयापासून पाच रुपये किलो इतका कमी भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नगर बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली फुले फेकून दिली. हेच का भाजप सकरारचे “अच्छे दिन’ म्हणत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

-Ads-

नगर तालुक्‍यातील बहुतांश गावांत दुष्काळ आहे. खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे. तलाव आटले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी वाढली आहे. अशाही परिस्थितीत नगर, पारनेर व नेवासे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी झेंडू व शेवंतीची शेती केली. घटस्थापनेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून नगर तालुक्‍यासह पाथर्डी, आष्टी, नेवासे, राहुरी, पारनेर तालुक्‍यातील अनेक भागातून फुलउत्पादक शेतकऱ्यांनी आपली फुले विक्रीसाठी बाजार समितीत आणली होती. काही शेतकरी रात्रीच मालवाहतूक गाडी घेऊन बाजार समितीत आले, तर काहींनी मोटारसायकलवरून फुले विक्रीसाठी आणली; परंतु त्यांचा आज भलताच अपेक्षाभंग झाला.

गेल्या दोन महिन्यापासून फुलांना भाव नाही. दोन रुपये किलोने फुले विकली जात होती. मध्यंतरी झेंडू व शेवतींच्या फुलांचे दर पाहून शेतकऱ्यांनी तोडणी लांबणीवर टाकली होती. काहींनी भाव नसल्याने शेतात नांगर घातले. किमान नवरात्रीत तरी झेंडू व शेवंतीला चांगला भाव मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटले. त्यामुळे थांबविलेली फुलांची तोड पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणात फुले आणली.

नगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे फुलांना फारसा उठाव नव्हता. मागणीही अतिशय कमी होती. त्यामुळे आज पहाटे अतिशय कमी दरात लिलाव सुरू झाले. सुरुवातीला शेवंती व झेंडूच्या फुलांना 15 ते 18 रुपये प्रतिकिलो बाजार मिळाला; मात्र एक तासानंतर फुलांचे भाव गडगडले. दहा रुपये व पाच रुपये असे भाव घसरत गेले. नंतर तर एक रुपयांना किलो असा भाव मिळायला लागल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आपली फुले आवारात फेकून दिली.

या वेळी घोडेगाव व नगर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त केला. हे सरकार शेतकऱ्यांचे नसून व्यापाऱ्यांचे आहे, अशी टीका केली. शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव नाही. नफा तर रुपयाचा नाही. फुलासांठी झालेला खर्च, तोडणीसाठीची मजुरी, वाहतूक खर्चाचे करायचे काय, याच चिंतेत शेतकरी दिसत होता. चांगल्या प्रतीच्या फुलांना ही भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना फुले फेकून द्यावी लागली. फेकून दिलेली फुले पिशव्यांत घेऊन ग्राहक मात्र खुशीत घरी जात होते. त्यांनाही शेतकऱ्यांची दया आली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)