गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची आज शक्तिपरीक्षा

पणजी – गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आज शक्तिपरीक्षेला सामोरे जाणार आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

गोवा विधानसभेचे एकूण संख्याबळ 40 इतके आहे. मात्र, आधीचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपचे आमदार फ्रान्सिस डिसूझा यांचे निधन तसेच कॉंग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा यामुळे सभागृहाचे संख्याबळ 36 पर्यंत खाली आले आहे. सरकारने 21 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. भाजपचे 12 तर मित्रपक्ष गोवा फॉरवर्ड पार्टी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे प्रत्येकी 3 आमदार आहेत. याशिवाय, 3 अपक्ष आमदार सरकारच्या बरोबर आहेत. विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसचे 14 आमदार आहेत. उर्वरित एक आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here