फ्लिपकार्ट समुहाचे सीईओ ‘बिन्नी बन्सल’ यांचा राजीनामा

नवी दिल्ली – फ्लिपकार्ट समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. व्यक्तिगत पातळीवरच्या गंभीर गैरवर्तवणूकीच्या अरोपांच्या पार्श्‍वभुमीवर त्यांनी राजीनामा दिला असल्याचे फ्लिपकार्टची नवीन पालक कंपनी वॉलमार्टने म्हटले आहे. बन्सल यांनी आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत, असेही वॉलमार्टने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

बिन्नी आणि सचिन बन्सल यांनी मिळून “फ्लिपकार्ट’ ही देशातील सर्वात मोठी ऑनलाईन रिटेल कंपनी सुरू केली होती. बिन्नी बन्सल यांच्यावर गैरवर्तवणूकीचे आरोप झाल्यावर फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टमधील त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून या आरोपांबाबत तपास केला गेला. ही चौकशी पूर्णपणे सखोल व्हावी, याकडे कंपनीने जाणीवपूर्वक लक्ष दिले होते.

-Ads-

या चौकशीमध्ये बिन्नी यांच्याविरोधात केल्या गेलेल्या आरोपांसंदर्भात कोणतेही पुरावे आढळले नाहीत. मात्र बिन्नी यांच्या संदर्भात पारदर्शकतेचा अभाव आणि अन्य काही त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळेच बिन्नी यांनी राजीनामा देन्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा निर्णय स्वीकारण्यात आला आहे, असेही वॉलमार्टच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)