फ्लॅटचा आकार लहान होतोय

बाजार आणि अर्थव्यवस्थेच्या बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम हा फ्लॅटच्या आकारावरही होत आहे. एका अंदाजानुसार दिल्लीसह अनेक शहरात गेल्या पाच वर्षात फ्लॅटचा सरासरी आकार हा 16 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. 40 लाखांपर्यंतचे फ्लॅट सर्वात कमी आकाराचे असल्याचे निदर्शनास आले आहे. बिल्डर देखील आपल्या गृहप्रकल्पात घराचा आकार कमी करत असून त्यामागे लहान घरांना वाढती मागणी हे कारणही सांगितले जात आहे.

एका अहवालानुसार दिल्लीत 2014 मध्ये फ्लॅटचा सरासरी आकार हा 1485 चौरस फूट होता. तो 2018-19 मध्ये 1250 चौरस फूट झाला आहे. 40 लाखांपर्यंतच्या घरांचा सरासरी आकार हा 750 हून 580 चौरस फूट झाला आहे. यात 23 टक्के घसरण झाली आहे. घराचा आकार कमी होण्यामागे परवडणाऱ्या घरांना वाढती मागणी हे एक कारण सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, दिल्ली, पुणे यासारख्या शहरात बजेट फ्रेंडली घरांना मागणी वाढत चालली आहे. बहुतांश विकासक ही मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने घराचे आकारमान कमी करत आहेत. दुसरीकडे खरेदीदार हे मेंटेनन्सचा जादा खर्च देण्यापासून स्वत:ला वाचवत आहेत. पूर्वीप्रमाणे आता मोठे घर खरेदी करण्याबाबत फारशी उत्सुकता दिसून येत नाही. लहान घरांना रिसेल करणे तसेच त्यांना भाड्याने देणेही मोठ्या घरांच्या तुलनेत अधिक सोयीचे जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)