पन्ना – मध्यप्रदेशत एक कार दरीमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील 5 महिला ठार झाल्या आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री झाली, असे पोलिसांनी सांगितले. ककारहाती येथील रहिवासी असलेल्या महेश गुप्ता यांच्या कुटुंबातील महिला सटाणायेथून परतत असताना हा अपघात झाला. गुप्ता स्वतःच कार चालवत होते.
पन्ना ककरहाती रस्त्यावर कारवरचा ताबा सुटल्याने कार खोल दरीमध्ये कोसळली, असे पन्ना कोतवाली पोलिस ठाण्याचे अंमलदार अरविंद कुजुर यांनी सांगितले. या अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा रेवा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चालक मनोज गुप्ता यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.