बालाकोट अड्ड्यात होत्या पंचतारांकित सुविधा 

भारतीय हवाईदलाने आज पाकिस्तानातल्या बालाकोट येथील जैश ए महंमदचा अड्डा उद्धवस्त केला. दहशतवाद्यांच्या या अड्डयात स्वीमिंग पुलासह अनेक पंचतारांकित सुविधा उपलब्ध होत्या अशी माहिती मिळाली आहे. विरळ जंगलात हिलटॉपवर हा तळ होता. त्यात शेकडो दहशतवाद्यांनी प्रशिक्षण देण्याची सुविधा होती. स्वतंत्र किचन, हमामखाना वगैरे सुविधाही तेथे मौजूद होत्या. तेथेच शस्त्रास्त्रांचाही मोठा साठा उपलब्ध होता या हल्ल्यात तो नष्ट झाला. त्या हल्ल्यात किमान तिनशे दहशतवादी ठार झाले असावेत असा भारताचा कयास आहे.

एका स्त्रोतातून मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी तीनशे ते तीनशे पंचवीस दहशतवादी आणि 25 ते 27 प्रशिक्षणार्थी एवढे मनुष्यबळ उपस्थित होते. मौलाना मसुद अझर हा तेथे सातत्याने येऊन उपस्थितांना इस्लामवरची प्रवचने देत असे. त्यातून त्यांच्यात कट्टरतावाद जोपासण्याचा सततचा प्रयत्न होत असे. हा तळ कुन्हार नदीच्या किनारी आहे. त्याद्वारे तेथे पाण्याखालून हल्ल्यांचेही प्रशिक्षण दिले जात असावे असा सूत्रांचा कयास आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागात तग धरून कसे राहावे याचे मुख्य प्रशिक्षणही तेथे दिले जात होते. त्या खेरीज शस्त्रे चालवणे, स्फोटकांचा वापर करून घातपाती कारवाया घडवणे याची नियमीत प्रात्यक्षिके तेथे घडवली जात होती. बालाकोटचा हा तळ दोन्ही देशांच्या प्रत्यक्ष ताबारेषेपासून सुमारे 80 किमी अंतरावर होता. पाकिस्तानातल्या अबोटाबाद शहराजवळ हे ठिकाण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)