अमेरिकेत टेक्‍सासमधील गोळीबारात पाच पोलिस जखमी ; दोन हल्लेखोरही ठार

ह्युस्टन : अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये काही संशयितांवर वॉरंट बजावण्यास आलेल्या पोलिसांवर या संशयितांनी अचानक गोळीबार सुरू केल्याने त्यात पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत तर नंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन संशयित ठार झाल्याची घटना घडली आहे.

शहराच्या हार्डिंग स्ट्रीटवर ही घटना घडली. टेक्‍सास प्रांताचे गव्हर्नर ग्रेग अबोट्ट यांनी या घटनेबद्दल तीव्र दुख: व्यक्त केले असून गोळीबारात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून नागरीकांनी प्रार्थना करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. सामान्य नागरीकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी अत्यंत धाडसाने कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांविषयी त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वॉरंट बजावण्यासाठी आलेले हे पोलिस पथक मादकद्रव्यांच्या विरोधातील पथक होते.तथापि ज्या संशयितांवर हे पथक वॉरंट बजावणार होते त्यांच्यावर नेमके काय गुन्हे होते हे मात्र अजून समजलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)