हिमस्खलनातून पाच जणांना वाचवण्यात यश

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमधील बंडिपोरा जिल्ह्यात आज आलेल्या हिमस्खलनामध्ये अडकलेल्या पाच जणांना सुखरुप सोडवण्यत यश आले आहे. जम्मू काश्‍मीरच्या उत्तर भागातील बंडिपोरा जिल्ह्यातल्या चरवान येथे आज सकाळी हिमस्खलन झाले होते. बर्फाच्या ढिगाऱ्याखाली पाच जण गाडले गेल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाकडून त्वरित शोध आणि बचाव मोहिम सुरु केली. बर्फाखाली गाडल्या गेलेल्या सर्व पाचही जणांना पोलिस आणि लष्कराच्या बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढले, असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान हिमाचल प्रदेशात सिमला येथे तीन दिवसांपूर्वी हिमस्खलनामुळे बर्फाखाली गाडल्या गेलेल्या लष्कराच्या पाच जवानांचा अद्यापही कोणताही ठावठिकाणा समजू शकलेला नाही. चीनच्या सीमेजवळ किनौर जिल्ह्यात शिपकी ला येथे तीन दिवसांपूर्वी हिमस्खलन झाले होते. त्यामुळे लष्कराच्या “जेएके रायफल्स’चे सहा जवान बर्फाखाली गाडले गेले होते. त्यात चौघे हिमाचल प्रदेशातील तर उत्तराखंड आणि जम्मू काश्‍मीरमधील प्रत्येकी एका जवानाचा समावेश होता. मदत आणि बचाव कार्यादरम्यान यापैकी एका जवानाचा मृतदेह सापडला होता. उर्वरित पाचजण अद्यापही बेपत्ता आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)