कोल्हापुरच्या आंतरराज्यीय ‘श्रीधर भाई गँगच्या’ पाच जणांना मोका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई

कोल्हापूर – जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आजरा, चंदगडसह सिंधुदूर्ग आणि गोवा राज्याचे पूर्व भागात अवैध मद्य तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय कुप्रसिध्द ‘श्रीधर भाई गँग’ला मोका लावण्यात आला. कोल्हापूर पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई केली. गँगचा म्होरक्या संशयित श्रीधर अर्जुन शिंगटे, त्याचे सिंधुदुर्ग मधील साथीदार नेल्सन ईजामाईल फर्नांडीस उर्फ बाबा नेल्सन, विनायक साठेलकर, यशवंत चंद्रकांत कारीवडेकर, कृष्णा अनिल म्हापसेकर अशी त्यांची नावे आहेत.

कुप्रसिध्द गुंड श्रीधर शिंगटे हा साथीदारांच्या मदतीने खूनाची सुपारी घेवून अवैध अग्नीशस्त्राचा वापर करुन खून करणे, प्राणघातक शस्त्रानिशी दरोडा, खंडणी, पैशची वसुली करीता अपहरण, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे करीत होता. त्याचे विरोधात संघटीत गुन्हेगारीचे नऊ गुन्हे दाखल आहेत. आंतरराज्यीय मद्यचोरीमध्येही त्यांची व्याप्ती मोठी होती. संशयित शिंगटे आणि नेल्सन फर्नांडीस यांचा निष्पन्न झालेला सहभाग, तसेच सीमावर्ती भागातील पट्टयामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांना प्रभावीत करण्याचे हेतूने या गँगचा वापर होवू शकतो. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे आणि पोलीस उपअधीक्षक अनिल कदम यांना शिंगटे गँगच्या विरोधात मोका कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी कारवाई करत फॉर व्हीलर गाड्या देखील जप्त केल्या आहेत.

भाईंची गँग या नावाने परिचित असणार्‍या या टोळीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी, शाहुपुरी, जुना राजवाडा, नेसरी पोलिस ठाणे, गडहिंग्लज उत्पादन शुल्क विभाग, आजरा पोलिस स्टेशन, सावंतवाडी पोलिस स्टेशन येथे विविध प्रकारचे ९ गुन्हे नोंद आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)