पालिकेच्या गंगाजळीत पावणे पाच लाखांची शिल्लक

सातारा पालिकेचे बजेट सादर

सातारा – सातारा पालिकेच्या हद्दीतील एकूण चौतीस हजार मिळकतींचा मालमत्ता कर अवघा चौदा कोटी आणि थकबाकी वसुली अवघी 38 टक्के असल्याने पालिकेची गंगाजळी आटल्याचे अंदाजपत्रकाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. श्री शिल्लक अवधी 4 लाख 67 हजार दाखवण्यात आल्याने सत्ताधारी सातारा विकास आघाडीने आकड्यांचा खेळ केल्याचा आरोप विरोधकांनी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जाहिरात व वृक्ष उपकर अनुक्रमे अडीच लाख व पासष्ट लाख दाखवण्यात आला. त्या आकडेवारीवरसुद्धा अविनाश कदम यांनी केल्याने आकडेवारीच्या खेळाचा आरोप गडद झाला. हे अंदाजपत्रक तुटीचे असून पालिका अधिनियमांचे उल्लंघन करणार असल्याचा आरोप झाला. मूळ विकास कामांपेक्षा आस्थापना खर्च चक्क पन्नास टकक्‍यावर गेल्याने सातारकरांचे पैसे भलत्याच ठिकाणी खर्च होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाणीपुरवठा विभागाची तूट पावणेसहा कोटीची सफाई सेवेसाठी जादा 7 कोटी 60 लाख रुपये जादा खर्च यामुळे पालिकेच्या महसूल वृध्दीला प्रचंड खीळ बसल्याचे समोर आले. सफाई सेवा ही 366 टक्के तुटीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी केल्याने पालिकेच्या अंदाज पत्रकीय सभेत एकच गोंधळ झाला. एलईडी दिव्यांचे बिल 2 कोटी 95 लाख खर्च दाखवला गेला म्हणजे प्रत्यक्षात महसूल बचतीच्या या केवळ गाव गप्पा असल्याचे आकडेवारीन सिद्ध केले.

खर्चाच्या बाबी

कर्मचारी वेतन – 17 कोटी 36 लाख
निवृत्ती वेतन – नऊ कोटी साठ लाख
शिक्षण मंडळ अनुदान – 2 कोटी 50 लाख
इमारत देखभाल दुरुस्ती -5 कोटी 48 लाख
रस्ते नाले गटार सफाई -75,00,000
नवीन प्रशासकीय इमारत बांधणी -65,00,000
रस्ते बांधणी – 10 कोटी
शाहू कला मंदिर सुधारणा – 50 लाख
पंतप्रधान आवास योजना -15 कोटी

उत्पन्नाच्या ठळक बाबी

मालमत्ता कर – 14,00,00,000
जाहिरात कर- 2,50,000
वृक्ष उपकर- 65,00,000
खुल्या जागा भाडे – 4,00,000
इमारती भाडे – 80,00,000
पाणीकर- 4,00,00,000
कास धरण उंची वाढवणे – 10 कोटी 31 लाख
थकित घरपट्टी विलंब आकार – 4 कोटी

खर्चाच्या बाबी

कर्मचारी वेतन – 17 कोटी 36 लाख
निवृत्ती वेतन – नऊ कोटी साठ लाख
शिक्षण मंडळ अनुदान – 2 कोटी 50 लाख
इमारत देखभाल दुरुस्ती -5 कोटी 48 लाख
रस्ते नाले गटार सफाई -75,00,000
नवीन प्रशासकीय इमारत बांधणी -65,00,000
रस्ते बांधणी – 10 कोटी
शाहू कला मंदिर सुधारणा – 50 लाख
पंतप्रधान आवास योजना -15 कोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)