सन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र

गावनिहाय यादी 20 फेब्रुवारी रोजी होणार प्रसिध्द

सोलापूर – केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंर्गत वार्षिक सहा हजाराचा लाभ मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील 12 लाख 33 हजार 57 शेतकऱ्यांपैकी 5 लाख 38 हजार 609 शेतकरी प्राथमिकदृष्ट्‌या पात्र ठरले आहेत.

माहिती अपलोड करण्याची धावपळ
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत प्राथमिकदृष्ट्‌या 5 लाख 38 हजार 609 शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. शनिवारअखेर 23 गावांतील 3 हजार 833 शेतकरी कुटुंबाची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांची नावे येत्या दोन दिवसात संकेतस्थळावर अपलोड केली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पात्र शेतकऱ्यांची यादी 20 फेब्रुवारी रोजी गाव पातळीवर प्रसिध्द करून त्यावर हरकती मागविण्यात येणार आहेत. हरकतीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे व ही यादी 26 फेब्रुवारीअखेर केंद्र आणि राज्य शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यावर प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरूवात होणार आहे.

केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकऱ्यांना दर महिन्याला पाचशे रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये देण्याची तरतूद केली आहे. पाच एकरांपर्यंतचे क्षेत्र असलेला शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे. या योजनेंतर्गत डिसेंबर 2018 पासूनच लाभ दिला जाणार आहे. ही रक्कम चालू फेब्रुवारी महिन्यापासून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

प्राथमिकदृष्ट्‌या जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची माहिती संकलित केली असून ती आता संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. माहिती अपलोड होताच पात्र शेतकऱ्यांना या महिन्यातच डिसेंबर 2018 व जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2019 या चार महिन्यांचा दोन हजारांचा पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर दर चार महिन्यांनी दोन हजाराचा हप्ता वितरित केला जाणार आहे.

दुष्काळी निधी आणि शेतकरी सन्मान निधीसाठी माहिती जमा करण्याचे काम एकदमच आल्याने तलाठी आणि महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ताण आला आहे. एकूणच काम करताना त्यांची कोंडी होत आहे. वरिष्ठ अधिकारी याचा दररोज आढावा घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)