कार पुलावरून कोसळल्याने लातुरात 5 ठार

लातूर (प्रतिनिधी): लातूरमध्ये बार्शी रोडवर कार चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातामध्ये 5 जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. कळंबहून लातूरकडे लग्नकार्यासाठी जात असताना हा अपघात झाला. मुरुड-अकोला गावाजवळील जोतिबा मंदिर जवळ ही घटना घडली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालूक्‍यातील मौजे डिकसळ येथील सातजण सोमवारी लातूर शहराजवळील 12 नंबर पाटीवर येत होते. दरम्यान मुरुड-अकोला गावाजवळील ज्योतिबा मंदीरालगतच्या पुलावर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार पुलावरून खाली कोसळली.

यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघांना लातूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.

ज्ञानेश्वर खंदारे, परमेश्वर आंबेरकर, गणेश सोमसे, जगन्नाथ पवार व नाना शिंदे अशी मृतांची नावे असून हे सर्व डिकसळ येथील रहिवासी आहेत. तर श्रीकांत अंबिकार दत्तात्रय जाधव हे जखमी झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)