झारखंडमधील चकमकीत पाच गनिम ठार

file photo

रांची : झारखंड मधील खुंती जिल्ह्यात काल सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत पिपल्स लिबरेशन फ्रंट या संघटनेचे पाच गनिम ठार झाले. ही बंदी घालण्यात आलेली संघटना आहे. सीपीआय माओवादी या संघटनेशी फारकत घेतलेल्या माओवाद्यांनी ही स्वतंत्र संघटना स्थापन केली होती.

खुंती जिल्ह्यातील मुरहु पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे गनिम आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे कारवाई सुरू केली त्यावेळी ही चकमक झाली. त्यात पाच जण ठार झाले तर त्यांचे अन्य दोन साथीदार जखमी झाले आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या गनिमांकडून दोन एके रायफली, दोन पॉईन्ट 315 रायफली, एक पिस्तुल आणि चार गावठी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)