बहिणीशी विवाह केल्याचा राग ; दोन मेव्हण्यांसह तीघे जेरबंद
पुणे: बहिणीशी आंतरजातीय विवाह केल्याने दोघा भावांनी एका तरुणावर पिस्तूलातून पाच गोळ्या झाडल्या. ही घटना बुधवारी रात्री चांदणी चौकात घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तीघांना अटक केली आहे.
तुषार प्रकाश पिसाळ(20,रा.राजेगाव , ता. भोर) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी सागर लहू तावरे , अकाश लहू तावरे(22,रा.राजे,ता.भोर), सागर रामचंद्र पालवे(21) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी तुषार तावरे यानी आकाश व सागर तावरे यांची बहिण विद्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. विद्याच्या घरच्यांचा विवाहास विरोध होता. यामुळे त्यांच्यात पुर्वीही वाद झाले होते. तुषार यास मुलीच्या नातेवाईकांकडून सतत जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या. हाच राग मनात धरुण विद्याचा भाऊ आकाश व सागर याने चुलता राजु तावरे व त्याचा मित्र सागर पालवे यांच्याशी संगणमत करुन कट रचला. तुषार हा त्याच्या मित्रासमवेत बुधवारी रात्री चांदणी चौकाजवळील पेट्रोलपंपाजवळून जात असताना या चौघांनी त्याचा पाठलाग केला. यानंतर राजु तावरे याने त्याच्याकडील पिस्तूलातून तुषारवर पाच गोळ्या झाडल्या. यानंतर तु मरायलाच पाहिजे होता असे म्हणत शिवीगाळ करुन निघुन गेले. तुषार हा सह्याद्री रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान युनिट चारचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना या गुन्हयातील आरोपी जंगली महाराज रस्त्यावर संभाजी पार्क येथे उभे असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र पोलिसांना पहाताच आरोपी तेथून पळून जाऊ लागले. पोलिसांनी चारही बाजूंनी त्यांना घेरुन पकडले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त
अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी सुनिल पवार, शंकर संपते, विशाल शिर्के, शंकर पाटील, रमेश चौधर, निलेश शिवतरे यांच्या पथकाने केली