असले फितूर वाघ असूच शकत नाहीत : अजित पवार यांचा उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला

मुंबई – भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगर मतदरासंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. एकेकाळी अमित शहा यांना अफजल खान यांची उपमा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत हजेरी लावल्याने विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावत “असले फितूर वाघ असूच शकत नाहीत, असे म्हटले आहे.

अजित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 5 वर्षे एकमेकांना पटकणारे, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझलखानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात! असले फितूर वाघ असूच शकत नाहीत. शिवसैनिक तर मुळीच नाही’. शिवरायांच्या नावाने मतं मागणे म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)