फिट्‌चकडून भारताच्या मानांकनात बदल नाही

नवी दिल्ली – फिट्‌च या जागतीक पतमानांकन संस्थेने भारताच्या पतमानांकनात कसलाही बदल करण्यास नकार दिला आहे. या संस्थेने भारताचे पतमानांकन बीबीबी- असे कायम ठेवले आहे. गुंतवणुकीसाठी सर्वात कमी दर्जा मात्र आगामी काळात सुधारणा होण्याची शक्‍यता असा या पतमानांकनाचा अर्थ आहे. भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेतील काही बाबी आणखीही ठिसूळ असल्यामुळे भारताच्या पतमानांकनात वाढ केली नसल्याचे या संस्थेने म्हटले आहे.

मात्र या वर्षी भारताचा विकासदर जगात सर्वात जास्त म्हणजे 7.8 टक्‍के राहणार असल्याचे या कंपनीला वाटते. गेल्या वर्षी भारताचा विकासदर 6.7 टक्‍के इतका होता. पुढील दोन वर्षात मात्र भारताचा विकासदर मंदावणार असल्याचे या संस्थेला वाटते. बॅंका आणि बिगर बॅंकांतील भांडवलाची स्थिती आशादायक नसल्यामुळे भांडवलाचा वापर कमी होण्याची शक्‍यता असल्यामुळे आगामी वर्षात याचा भारताच्या विकासदरावर परिणाम होणार आहे, असे या संस्थेचे म्हणणे आहे.

आगामी काळात जागतिक परिस्थितीही भारतासाठी पोषक राहणार नाही. क्रुडचे दर अस्थिर आणि चढे राहण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर भारत सरकार आणि भारतातील कंपन्यांना बाहेरून स्वस्त भांडवल मिळण्याची शक्‍यता कमी आहे. या सर्व बाबीचा भारताच्या विकासदरावर पुढील दोन वर्षात परिणाम होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)