मनी लॉंड्रिग प्रकरणातील फरारी हितेश पटेलला अल्बानियात अटक

अल्बानिया: मनी लॉंड्रिग प्रकरणातील एक फरारी आरोपी हितेश पटेलला अल्बानियात अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 5 हजार कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणात हितेश पटेल एक आरोपी आहे, अटकेनंतर त्याचे प्रत्यार्पण करण्यात येणार असल्याची शक्‍यता ईडीच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. स्टर्लिंग बायोटेक प्रकरणात वॉटेड असलेल्या हितेश पटेलच्या विरोधात 11 मार्च रोजी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

चालू वर्षी जानेवारी महिन्यात दिल्ली न्यायालयाने गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक या औषधी कंपनीच्या चार प्रमोइटर्सविरुद्ध प्रत्यार्पणासाठी कारवाई करण्याची अनुमती दिली होती. नितीन जयंतिलाल संदेसरा, हितेश नरेंद्र भाई पटेल, चेतन जयंतिलाल संदेसरा, दीप्ती चेतन संदेसरा या चार प्रमोटर्सवर आंध्र बॅंकेमध्ये 8 हजार 1शे कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. हे चारही जण इटली आणि नायजेरियात राहत होते. अतिरिक्त न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांनी या संबंधात ईडीला आदेश दिले होते. या चार आरोपींपैकी हितेश पटेलला 22 मार्च रोजी अल्बानियात अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)