पाथर्डीतील फरार देवीदास खेडकरला अटक

पाथर्डी – पाथर्डीतील रोजगार हमीच्या कामातील गैरव्यवहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेला मात्र उमेदवारांच्या प्रचारात खुलेआम फिरणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माजी जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी येथून अटक केली.

पाथर्डी तालुक्‍यातील एकनाथवाडी येथील रोजगार हमीच्या कामातील गैरव्यवहार प्रकरणी दाखल अपहाराच्या गुन्ह्यातील आरोपी मनसेचा जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य देविदास खेडकर याचा जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडकर पाथर्डीमधून पसार झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी 14 जानेवारीला अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. खेडकर हा 24 मार्चला पाथर्डी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचार फेरित सहभागी झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खेडकर याला त्याच्या राहत्या घरातून शुक्रवारी अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)