पहिला कसोटी सामना: भारातोसमोर फलंदाजांच्या निवडीचा पेच 

file photo

लंडन: विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या संघनिवडीवर बरीच टीका झाली आहे. विराटने चेतेश्‍वर पुजाराला बाजूला ठेवून शिखर धवनची निवड केली. तसेच लोकेश राहुलला संघात स्थान दिले. परंतु हा जुगार भारतावर उलटला. शास्त्री-कोहली जोडीने अत्यंत महत्त्वाच्या तिसऱ्या क्रमांकाबाबत जुगार खेळण्याची ही पहिील वेळ नाही. 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत शास्त्री-कोहली यांनी पुजाराच्या जागी रोहित शर्माला खेळविले होते.

दोन कसोटींनंतर रोहितला खालच्या क्रमांकावर पाठविण्यात आले व अजिंक्‍य रहाणेला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुजारा पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आला व सहा कसोटींनंतर त्याला पुन्हा वगळण्यात आले. विंडीजविरुद्ध कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळला.

-Ads-

यंदाच्या कौंटी मोसमात पुजारा खेळला असूनही तो संघात असावा असे शास्त्री-कोहली यांना वाटते की नाही हाच खरा प्रश्‍न आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 36 कसोटी सामन्यांत प्रत्येक वेळी वेगवेगळे 11 खेळाडू खेळले आहेत. त्यामुळे ठराविक खेळाडू वगळता बाकीच्यांना पुढच्या कसोटीत आपण असणार की नाही हेही माहीत नसते. आता इंग्लंड दौऱ्यात तरी शास्त्री-कोहली जोडीने संघनिवडीत थोडे सातत्य राखावे आणि त्याला तर्कशास्त्राची जोड द्यावी अशी अपेक्षा आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)