पहिला कसोटी सामना: इशांत शर्माचा भेदक मारा! इंग्लड १८० धावांवर सर्वबाद  

बर्मिंगहॅम: इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने एकाकी झुंज देत १४९ धावा केल्या. कोहलीने केलेल्या खेळीमुळेच भारतीय संघाला सन्मान जनक २७४ एवढी धावसंख्या उभारता आली आहे.

दरम्यान, पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. इंग्लड संघ ५३ ओव्हरमध्ये १८० धावांवरच मजल मारू शकला. इशांत शर्माने भेदक गोलंदाजी करत इंग्लडचे पाच फलंदाज तंबूत परत पाठविले. आश्विनने ३ तर उमेश यादवने २ विकेट मिळवल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)