पहिला कसोटी सामना: इंग्लंडसाठी संघनिवड सोपी 

लंडन: भारताच्या अगदी उलट परिस्थिती इंग्लंडची आहे. पहिली कसोटी अनपेक्षितरीत्या जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी संघनिवड ही त्यांच्यासाठी अवघड कामगिरी नव्हती. बेन स्टोक्‍स न्यायालयीन प्रकरणामुळे उपलब्ध नसल्याने आणि डेव्हिड मेलनला वगळण्यात येणार हे निश्‍चित असल्याने संघात दोन फिरकी गोलंदाज हवेत की नाही इतकेच इंग्लंडचा कर्णधार जो रूटला ठरवायचे आहे.

अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि सॅम करन हे तीन वेगवान गोलंदाज भारतासाठी पुरेसे असल्याचे त्याचे मत असल्यास ऑलिव्हर पोपचा पदार्पणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. केवळ 20 वर्षीय पोपने यंदाच्या कौंटी मोसमात 684 धावा केल्या आहेत. परंतु मायदेशातील आकडेवारी हीच इंग्लंडसाठी चिंतेची बाब आहे. भारताच्या गेल्या दौऱ्यापासून इंग्लंडने मायदेशातील नऊपैकी केवळ तीन कसोटी सामने जिंकले आहेत. भारताविरुद्ध ही आकडेवारी सुधारण्याची त्यांना संधी आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)