पहिला कसोटी क्रिकेट सामना : रूटच्या खेळीने इंग्लंडचे वर्चस्व

जो रूटच्या जेनिंग्ज व बेअरस्टोच्या साथीत बहुमोल भागीदाऱ्या

बर्मिंगहॅम: कर्णधार जो रूटची शानदार फलंदाजी आणि त्याने कीटन जेनिंग्ज व जॉनी बेअरस्टो यांच्या साथीत केलेल्या बहुमोल भागीदाऱ्यांमुळे भारताविरुद्ध आज सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावांत 64 षटकांत 4 बाद 218 धावांची मजल मारली. त्यामुळे इंग्लंडच्या एक हजाराव्या ऐतिहासिक कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर फलंदाजांचेच वर्चस्व राहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जो रूटने कर्णधाराला साजेशी कामगिरी करताना 156 चेंडूंत 9 चौकारांसह 80 धावांची दमदार खेळी केली. मेलनला शमीने बाद केले तेव्हा इंग्लंडची 3 बाद 112 अशी अवस्था होती. परंतु रूटने बेअरस्टोच्या साथीत चौथ्या गड्यासाठी 104 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून इंग्लंडचा डाव सावरला. अखेर विराट कोहलीच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे रूट धावबाद झाल्याने भारताला बहुमोल यश मिळाले.

त्याआधी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेताना इंग्लंडने उपाहारापर्यंत एक बाद 83 अशी मजल मारताना पहिल्या डावांत धावांचा डोंगर उभारून भारतीवर दडपण आणण्याचा इरादा स्पष्ट केला होता. ऍलिस्टर कूक आणि कीटन जेनिंग्ज यांनी पहिली आठ षटके सावधपणे खेळून काढली. परंतु अश्‍विनने कूकचा बळी घेत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर उपाहारासाठी खेळ थांबला तेव्हा जो रूट 63 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 31 धावांवर खेळत होता. तर जेनिंग्ज 80 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 38 धावा करून त्याला साथ देत होता.

अगोदरच्या चेंडूवर चौकार लगावणाऱ्या कूकला अश्‍विनचा पुढचा अचूक टप्प्यावरील चेंडू कळलाच नाही. पुढे वाकून बचावात्मक खेळण्याच्या प्रयत्नात बॅटमधून हुकलेल्या चेंडूने कूकची उजवी यष्टी वाकविली. कूकने 28 चेंडूंचा सामना करताना 2 चौकारांसह 13 धावा केल्या. कूकने कीटन जेनिंग्जच्या साथीत इंग्लंडला 8.5 षटकांत 26 धावांची सलामी दिली. उपाहारानंतर महंमद शमीने जेनिंग्जला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. जेनिंग्जने 98 चेंडूंत 4 चौकारांसह 42 धावा करताना जो रूटच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी केली. शमीने डेव्हिड मेलनला केवळ 8 धावांवर पायचित करून भारताला तिसरे यश झटपट मिळवून दिले. परंतु चौथा बळी मिळविण्यासाठी भारताला प्रतीक्षा करावी लागली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)