खाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम

डाकघर अधिक्षक ईश्वर पाटील यांची माहिती

कोल्हापूर, (प्रतिनिधी): कोल्हापूर डाकघर विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेने अवघ्या 4 महिन्यात 21 हजार बॅंक खाती सुरू करून महाराष्ट्र आणि गोव्यात प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती डाकघर अधिक्षक ईश्वर पाटील यांनी आज येथे बोलतांना दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1 सप्टेंबर रोजी जिल्हृयात इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेचे 7 क्‍सेस पॉईंटव्दारे सुरू केलेल्या बॅंकिंग व्यवहार आज जिल्ह्यातील 464 पोस्ट ऑफिसमार्फत होत असल्याचे सांगून डाकघर अधिक्षक ईश्वर पाटील म्हणाले, गेल्या 4 महिन्यात जिल्ह्यातील 465 पोस्टाच्या बॅंकिंग सुविधेमार्फत 50 लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. यापैकी 75 टक्के खाती ग्रामीण भागात असल्याचेही ते म्हणाले.

इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेमध्ये झिरो बॅंलेंसवर खाते सुरू करता येते असे सांगून डाकघर अधिक्षक ईश्वर पाटील म्हणाले, खाती उघडण्यासाठी केवळ आधार कार्डाचा नंबर व थंब आवश्‍यक आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी डाकघर विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेत आपले खाते उघडावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक व्यवस्थापक अमोल कांबळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)