बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मिळाला पहिला जमीनीचा तुकडा 

नवी दिल्ली: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जर्मनी मध्ये वास्तव्याला असलेल्या मुळच्या गुजराती महिलेने आपल्या वडिलोपार्जित जमीनीपैकी सुमारे 30 एकर जमीनीचा तुकडा नॅशनल हायवे रेल कार्पोरशनकडे हस्तांतरीत केला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेला हा पहिला भुखंड आहे.

ही जमीन देणाऱ्या महिलेचे नाव सविताबेन असे असून त्या सध्या जर्मनीत एक भारतीय हॉटेल चालवत आहेत. सुमारे 33 वर्षांपुवी लग्न होऊन त्या जर्मनीला गेल्या. त्यांची गुजरात मध्ये चंसद गावात 71 एकर जमीन आहे. ही जमीन हस्तांतरीत करण्यासाठी त्या मुद्दाम जर्मनीहून गुजरातेत आल्या होत्या. या प्रकल्पाला मिळालेला हा पहिला भुखंड आहे. याबद्दल बुलेट ट्रेन उभारण्याचे काम करणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशनने त्यांचे आभार मानले आहे.

508 किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत एकूण चौदाशे हेक्‍टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी 1120 जमीन खासगी जमीन मालकांकडून संपादित करावी लागणार आहे. या जमीन संपादनाच्या विरोधात दोन्ही राज्यांतील शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत केवळ 0.09 टक्के इतकी अल्पजमीनच या प्रकल्पासाठी मिळू शकली आहे. त्याच्या आतच पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पाचे भूमीपुजनही पुर्ण केले आहे पण तरीही अद्याप या प्रकल्पासाठी जमीन संपादनाचाच मूळ विषय प्रलंबीत असल्याने हा प्रकल्प नेमका कधी मार्गी लागणार या विषयी साशंकता आहे. शेतकऱ्यांना या जमीन संपादनासाठी राजी करण्यासाठी कार्पोरेशनने शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित करण्याचे योजले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)