आधी समृद्धी महामार्ग बनवा, नंतर नामकरणासाठी भांडा! : राष्ट्रवादी कॉंग्रेस

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा टोला 

मुंबई –
प्रस्तावित नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग उभारण्याअगोदरच या महामार्गाला कोणाचे नाव द्यायचे यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. त्यावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने निशाणा साधला. शेतकऱ्यांवर अन्याय न करता आधी समृध्दी महामार्ग बनवा आणि नंतरच महामार्गाच्या नामकरणावरून भांडा, असा टोला प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी भाजप-शिवसेनेला लगावला.

राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत शिवसेनेने समृध्दी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली. तर भाजपकडून माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली आहे. समृध्दीच्या नामकरणावरून सत्ताधारी भाजप-सेनेत वाद सुरू असताना राष्ट्रवादीने सरकारला आधी महामार्ग बांधून तो पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.

सुरूवातीला समृध्दी महामार्गाला विरोध करायचा आणि आता त्याच समृध्दी महामार्गाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करायची ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. समृध्दी महामार्गासाठी भूसंपादन होत असताना प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका शिवसेनेने सुरूवातीला घेतली होती. परंतु, आता शिवसेनेची भूमिका बदलली आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे न राहता महामार्गाच्या बाजूने कौल दिल्याची टीकाही मलिक यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)