मुंबई- बाॅलीवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’ याने आपल्या आगामी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या सिनेमा ची पहिली झलक सोशल मीडियावर प्रदर्शित केली आहे. हा चित्रपट एक हॉरर-कॉमेडी सिनेमा असणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार बरोबर अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’ सुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अक्षयने आपल्या अधिकृत ट्विटर आकाउंट वरून सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे.
Bringing you one bomb of a story,#LaxmmiBomb starring @Advani_Kiara & yours truly!Bursting in cinemas on 5th June,2020?
Fox Star Studios Presents
A Cape of Good Films Production in association with Shabinaa Entertainment & Tusshar Entertainment House
Directed by Raghava Lawrence pic.twitter.com/vlXyK4HkNE— Akshay Kumar (@akshaykumar) May 18, 2019
सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करताना अक्षयने असे, सुध्या सांगितले कि पुढील वर्षी २०२० ला ५ जून रोजी ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ सिनेमा साऊथच सुपरहिट ‘कंचना’ या सिनेमाचा रिमेक असणार आहे. राघव लारेंस हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.