भारतीय क्रिकेटचा पहिला ‘ग्लोबल स्टार’ – दिलीप सरदेसाई

भारतीय क्रिकेटमध्ये असे काही लढवय्ये खेळाडू आहेत ज्यांनीखऱ्या अर्थाने भर्राट क्रिकेट रुजवण्यात आणि लोकप्रिय करण्यात खूप मोठे योगदान  दिले. त्यांच्या काळात सामने टेलेव्हीजन सेटवर खूप क्वचित दिसत असत. वर्तमानपत्रे,मौखिक लोकप्रियता आणि आपल्याकडील प्रतिभेच्या जोरावर भारतीय जनमानसात क्रिकेट लोकप्रिय करण्यात मोलाची जबाबदारी पार पडली. अश्या खेळाडूंच्या पंक्तीतील एक अग्रेसर खेळाडू म्हणजे  दिलीप सरदेसाई.

गोवा येथील जन्म आणि त्यानंतर रणजीस्पर्धेत मुंबई संघासाठी त्याने जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले. दिलीप सरदेसाई त्यांच्या तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी ओळखले जायचे. खेळपट्टीवर टिकाव धरून फटकेबाजी करण्याचे जबरदस्त कसब त्यांनी आत्मसात केले होते. आपल्या याच प्रतिभेच्या जोरावर त्यांनी अनेकी दमदार खेळी केल्या.
१९६५ मध्ये न्यूझीलंडचा संघ भारतीय दौऱ्यावर आला होता त्यात दिलीप सरदेसाई यांनी त्या दौऱ्यात  २०० धावांची खेळी आणि दुसरी १०६ धावांची शतकी खेळी साकारली होती. या कामगिरीच्या जोरावर त्यांना १९६५चा ‘इंडियन क्रिकेट क्रिकेटर्स ऑफ द इयर’ हा पुरस्कार देखील मिळाला होता.
भारतामध्ये चांगली कामगिरी करणारे देसाई जागतिक क्रिकेटमध्ये १९७१ या वर्षात खूप प्रकाशझोतात आले. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. आग ओकणाऱ्या विंडीजच्या गोलंदाजीसमोर भारतीयांचा निभाव लागणार की नाही याचीच खरी कसोटी होती.  त्यात त्यांनी २१२, ११२ आणि १५० अश्या खूप मोठ्या खेळ्या करत खोऱ्याने धावा जमवल्या. या कामगिरीने दिलीप सरदेसाई क्रिकेटविश्वाचा चेहरा बनले.
क्रिकेटला अलविदा केल्यानंतर त्यांचे जीवन खूप शांत गेले.त्यांचा मुलगा राजदीप सरदेसाई हा मोठा पत्रकार आहे. या महानखेळाडूने २ जुलै २००७ मध्ये जगाचा अखेरचा निरोप घेतला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)