न्यूझीलंडमधील दोन मशिदीत अंधाधुंद गोळीबार; ४० ठार 

नवी दिल्ली – न्यूझीलंडमधील क्राईस्टचर्च शहरात अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आज येथील हेगली पार्क परिसरातील अल नूर मशीद समवेत दोन मशिदीवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी आहेत. न्यूझीलंडची पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी या देशाचा काळा दिवस म्हणून निषेध केला आहे.

पोलीस माइक बुश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये १ महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यांच्यानुसार मशिदीतील गोळीबारानंतर अनेक कारमध्ये आयईडी स्फोटके आढळून आली असून सर्व निकामी करण्यात आली आहेत.

-Ads-

दरम्यान, हेगली ओव्हल येथे खेळवण्यात येणारी बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंडचा सामना रद्द करण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)