कोल्हापूर लक्ष्मीपूजनाला हवेत गोळीबार 

लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातल्या पुलाची शिरोली इथे लक्ष्मी पुजनाचे निमित्ताने हवेत गोळीबार केल्या प्रकरणी शिरोली गावचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांच्या विरोधात शिरोली एमआयडिसी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंचाने आत्मसंरक्षणासाठी परवाना असलेल्या 12 बोअर च्या बंदुकीने आणि पिस्तुलाने अशा प्रकाराचे कृत्य केल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि शिरोली गावचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांनी हवेत गोळीबार केला. खवरेंनी लक्ष्मीपूजनाच्या आनंदात आपल्या 12 बोअर बंदूक आणि पिस्तूलातून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5 फैरी थेट हवेत झाडल्या आणि अख्खी शिरोली हादरली.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली हे राजकारणच केंद्र मानले जाते. कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते असणारे खवरे यांनी भाजपचे आमदार अमोल महाडिक आणि महादेवराव महाडिक यांच्या विरोधात शड्डू ठोकून शिरोली गावचे सरपंच पद कॉंग्रेसकडे खेचून आणले. शिरोली गावातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत बुधवारी रात्री लक्ष्मी पुजनाच्या वेळी शशिकांत खवरे यांनी आत्मसंरक्षणासाठी असलेल्या 12 बोअर बंदुकीने दोन आणि पिस्तुलाने तीन फैरी हवेत झाडल्या. भरचौकात अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी हवेत गोळीबार केला. हवेत गोळीबार करत असल्याचा व्हिडिओ व्हाटस्‌ ऍपवर व्हायरल झाला असून या व्हिडिओ व गोपनीय माहितीच्या आधारावर सरपंच खवरे यांच्यावर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पुंगळ्या आणि 12 बोअर बंदुक जप्त केली आहे. भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 30 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी खवरे यांचा शोध घेतला परंतु ते फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस रवाना झाले आहेत. दरम्यान अचानक एका मागोमाग दोन बंदुकीतून पाच फैरी झाडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)