लातूरमधील मध्यवर्ती बसस्थानकात गोळीबार

लातूर – येथील मध्यवर्ती बसस्थानक काल मध्यरात्री एका माजी सैनिकांच्या हातून चुकून गोळी सुटल्याने तो स्वतः यात जखमी झाला. ही गोळी त्याच्या डाव्या हाताच्या पंजातून आरपार गेली. या प्रकरणी पोलिसांनी माजी सैनिकास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील परवानाधारक पिस्टल देखील जप्त केले आहे.

लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान पंढरपूर-अहमदपूर एसटी आली. या एसटीत अहमदपूर तालुक्‍यातील होकरणा येथीाल 37 वर्षीय बालाजी शंकर मुखेडे हे माजी सैनिक प्रवास करीत होते. त्यांच्याजवळ स्वतःचे परवानाधारक पिस्टल होते. पिस्टल बाहेर काढून आपल्या डाव्या हातावर खेळत बसले होते. याच दरम्यान त्याच्या पिस्टलमधून एक गोळी त्याच्या डाव्या हाताच्या पंजाच्या आरपार गेली.

गोळीचा आवाज ऐकून एसटीमधील प्रवासी भेदरले. यानंतर तत्काळ गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिबारे, शहर पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यांच्या जवळील परवानाधारक पिस्टल जप्त करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणी लातूरच्या गांधी चौक पोलिसात शस्त्र कायदा 30 व भादवि 337 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)