लागोपाठ तिसऱ्या दिवशी पाकिस्तानकडून गोळीबार 

जम्मू – पाकिस्तानी लष्कराने आज लागोपाठ तिसऱ्या दिवशी मंगळवारीही प्रत्यक्ष ताबारेषेनजिक भारतीय ठाण्यांवर गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. त्यांनी अखनुर, सुंदरबनी या ठिकाणी गोळीबार करीत तोफगोळेही डागले.

यंदाच्या वर्षात आत्तापर्यंत शस्त्रसंधीचा भंग केल्याची पाकिस्तानकडून घडलेली ही 110 वी घटना आहे.
सोमवारी सकाळी पावणे अकराच्या सुमाराला पाकिस्तानी हद्दीकडून भारतीय हद्दीत हा मारा सुरू झाला. त्याला भारतीय बाजूकडूनही परिणामकारक उत्तर देण्यात आले. ही चकमक मंगळवारी सकाळपर्यंतही सुरूच राहीली. काल त्यांनी केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला तर अन्य चार जवान जखमी झाले आहेत. पुलवामा येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानी बाजूकडून भारतीय ठिकाणांवर सातत्याने असे हल्ले सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)