शहरात 19 ठिकाणी फटाके विक्रीस मुभा

डीपी रस्त्यावर यंदाही बंदी कायम : 457 स्टॉल असणार

पुणे : शहरातील फटाके विक्रेत्यांना महापालिकेकडून वेगवेगळ्या 19 ठिकाणी फटाके विक्रीस मुभा देण्यात आली आहे. त्यात सुमारे 457 स्टॉल असणार असून त्याचा लिलाव शुक्रवारी होणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यंदाही म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी रस्त्यावर फटाके विक्रीस बंदी असणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वर्षीपासून या जागेवर फटाके विक्रीस पोलीस आणि महापालिकेने मनाई कायम ठेवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेकडून वाहतूक पोलीस आणि अग्निशमनदलाच्या सूचनेनुसार, शहरात फटाके विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली जाते. त्यातही प्रामुख्याने ऍमेनिटी स्पेस तसेच रिकाम्या जागा दिल्या जातात. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने या वर्षीसाठी सुमारे 19 जागा निश्‍चित केल्या असून त्यात 457 स्टॉल असणार आहेत. त्यात सर्वाधिक स्टॉल हडपसरमध्ये असून त्यांची संख्या 70 आहे, तर कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 25 स्टॉल असणार आहेत.

या शिवाय, खराडी येथे 30 वानवडी येथे 20, कात्रजला 25, नदीपात्रात 35, लोहगाव येथे 5, नगर रस्ता येथे 8, गंगाधाम चौकात 8, कोथरूड भागात 65, सहकारनगर भागात 17 स्टॉल असणार आहेत. सुमारे 15 बाय 10 फूटांचे हे स्टॉल असणार असून ते 13 दिवसांसाठी एकवट 12 हजार 77 रुपये दराने भाडेकराराने दिले जाणार आहेत. तर त्यासाठी सुमारे 5 हजार रुपयांची अनामत रक्कम घेतली जाणार असल्याचे मालमत्ता व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)