फटाक्‍यांच्या बाजारपेठेतील उत्साह शिगेला

दरांत वीस टक्‍क्‍यांनी वाढ,तरीही खरेदीदारांची मोठी झुंबड

सातारा – अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच “चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ दाखविणाऱ्या फटाक्‍यांच्या बाजारपेठेतील उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीपेक्षा फटाक्‍यांच्या दरांत यंदा वीस टक्‍क्‍यांनी वाढ झालेली असली, तरी फटाक्‍यांच्या दुकानांवर खरेदीदारांची मोठी झुंबड उडत असल्याचे चित्र सध्या बाजारात आहे. मोठा आवाज करणाऱ्या फटाक्‍यांपेक्षा शोभेचे फटाके घेण्याकडे ग्राहकांचा विशेष कल असल्याचे फटाके विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दीपोत्सवाचे कुतूहल आबालवृद्धांपासून साऱ्यांनाच आहे. या सणाच्या पार्श्‍वभूमीवर महिनाभरापूर्वीपासूनच मुंबापुरीतील बाजारांत जय्यत तयारी सुरू झाली. फुले, मिठाई, सुका मेवा, कंदील, पणत्या, सोने-चांदी व हिरे मोत्यांच्या बाजारपेठांपासून कपड्यांच्या बाजारापर्यंत सगळ्याच बाजारपेठांनी ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक मोडला आहे. दिवाळी सणाचे मुख्य आकर्षण असलेला फटाक्‍यांचा बाजारदेखील या गर्दीपासून तसूभरही मागे नाही. प्रकाशाचा सण असा गौरव होणाऱ्या या सणानिमित्त गेल्या काही दिवसांत फटाक्‍यांच्या खरेदीला चांगलेच उधाण आले आहे. साताऱ्यात फटाके विक्रीचा अधिकृत परवाना असलेली पाचशेहून अधिक दुकाने आहेत.

येथे येणाऱ्या फटाक्‍यांत 90 टक्के फटाके शिवकाशी, तर 10 टक्के फटाके जळगाव, सोलापूर व कोल्हापूर येथून येतात. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या फटाक्‍यांमध्ये फुलबाज्या, भुईनळे, पाऊस, रॉकेट, फटाक्‍यांच्या माळा, लवंगी फटाके, तडतडी, विविध रंगांची उधळ करणाऱ्या शोभेच्या फटाक्‍यांचा समावेश आहे. लक्ष्मी बॉम्ब, डबलबार, कलर शॉट्‌ससारख्या दमदार व चांगल्या दर्जाच्या फटाक्‍यांकरिता ग्राहक दक्षिणेतील शिवकाशीच्या फटाक्‍यांना पसंती दाखवीत असल्याचे चित्र आहे. दिवाळीला अवघे तीन दिवस उरले असताना खण आळी राजवाडा तसेच जिल्हा परिषद मैदान व शहरातील दुकानांमध्ये ग्राहकांची तुफान गर्दी होत आहे.

यंदा बाजारात नवे फटाके आले नसले, तरी परंपरागत फटाके घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. विशेषतः लहान मुलांना आनंद होईल, अशा प्रकारचे फटाके घेण्यात ग्राहक आघाडीवर असल्याचे “इसाभाई फायर वर्क्‍स’ या कंपनीचे मालक अब्दुल्ला घिया यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)