उत्तरप्रदेशात फटाक्‍यांच्या कारखान्यात स्फोट ; 8 जणांचा मृत्यू

लखनौ  – उत्तरप्रदेशमध्ये शुक्रवारी एका फटाक्‍यांच्या कारखान्यात स्फोट होऊन 8 जण मृत्युमुखी पडले, तर तिघे जखमी झाले. तिन्ही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. बदायूंजवळच्या गावात फटाके बनवण्याचा परवाना असलेल्या कारखान्यात दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही.

कारखान्यात झालेल्या स्फोटाची तीव्रता मोठी होती. त्यामुळे कारखान्याजवळून जाणारे आणि नजीकच्या दुकानांत बसलेले काही जण जखमी झाले. मृतांमध्ये कारखान्याजवळून जाणाऱ्या दोघांचा समावेश आहे. स्फोटात 7 जण जागीच मृत्युमुखी पडले, तर एकाचे उपचार चालू असताना रूग्णालयात निधन झाले. स्फोटानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. त्यात ग्रामस्थांनीही मदत केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)