युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यला आग

नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू
कारवार – आयएनएस विक्रमादित्यवर लागलेली आग विझवताना शुक्रवारी एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. डी. एस. चौहान असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. ते लेफ्टनंट कमांडर होते. आयएनएस विक्रमादित्य ही भारताची एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे. ही घटना आयएनएस विक्रमादित्य कर्नाटकातील कारवार बंदरात प्रवेश करत असताना घडली. ही आग युद्धनौकेच्या एका कक्षामध्ये भडकली होती.

आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असताना डी. एस. चौहान यांचा मृत्यू झाला. आघाडीवर राहून त्यांनी नेतृत्व केले, असे नौदलाकडून सांगण्यात आले. आग नियंत्रणात आणल्यानंतर धुरामुळे चौहान यांची शुद्ध हरपली. त्यांना तत्काळ कारवार येथील नौदलाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जहाजाच्या क्रू ने तत्काळ पावले उचलत आग अन्यत्र पसरु न देता नियंत्रणात आणली, असे नौदलाकडून सांगण्यात आले. या आगीच्या चौकशीचे आदेश नौदलाने दिले आहेत. ही विमानवाहू युद्धनौका भारताने 2.3 अब्ज डॉलर मोजून रशियाकडून विकत घेतली आहे. भारताने आपल्या गरजेनुसार या विमानवाहू युद्धनौकेमध्ये काही बदल केले आहेत. आयएएस विक्रमादित्य 284 मीटर लांब असून 56 मीटर उंच आहे. 40 हजार टन वजनाची भारतीय नौदलाकडील ही सर्वात मोठी युद्धनौका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)