मुंबईत हॉटेल ताजजवळील इमारतीला आग

एकाचा मृत्यू, तर 14 जणांना वाचवण्यात यश

मुंबई – मुंबईतील हाय प्रोफाईल परिसरातील इमारतीला आज आग लागण्याची दुर्घटना घडली आहे. कुलाबा येथील जगप्रसिद्ध असलेल्या ताज हॉटेलजवळच्या एका इमारतीला रविवारी आग लागली. यात एका जणाचा मृत्यू झाला असून, 2 जण जखमी झाले आहेत. तर 14 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

कुलाबा येथील ताज हॉटेल जवळच्या चर्चिल चेंबर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी 12.17 मिनिटांनी आग लागली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार ही आग लेव्हल-2ची होती. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण इमारतीत अद्याप काही जण अडकल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. मेरिवेदर रोड येथील चर्चिल चेंबर’ला लेवल-2 ची आग लागल्याचा कॉल मिळाल्यानंतर अग्निशमनचे जवान बंबांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. आगीमुळे तिसऱ्या मजल्यासह बाजूच्या मजल्यांवर मोठ्या प्रमाणावर धूर साठला होता. तसेच या मजल्यावर 6 ते 7 लोक अडकले होते. यांपैकी एका 54 वर्षीय व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. तर इतर 14 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)