पुणे – लालमहालाशेजारी असणाऱ्या दुकानांमध्ये मोठी आग लागली आहे. याची माहिती मिळतातच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु असून धुराचे प्रमाण जास्त असल्याने आग विझविण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.