एरो इंडियाच्या पार्किंगमध्ये आग; 100 कार खाक

बेंगळूरु – एरो इंडिया शोच्या पार्किंगमध्ये आज अचानक आग लागली. येलाहांका एअर फोर्स स्टेशनच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या सुमारे 100 कार या आगीत जळून खाक झाल्या. या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

“एरो इंडिया’ शोसाठी आलेल्या नागरिकांच्या कार एकाच मैदानावर पार्क केल्या होत्या. या कार अगदी दाटीवाटीने उभ्या केल्या होत्या. त्यामुळे आग झपाट्याने पसरली. ही आग त्वरित आटोक्‍यात आणण्यात आली असून कोणाही नागरिकांना कोणतीही इजा झालेली नाही. पार्किंगच्या जागेवर वाळलेले गवत होते. तेथे सिगारेटचे थोटूक पडल्यामुळे ही आग लागली असावी, असा अंदाज अग्निशामक दलाचे महासंचालक एम.एन. रेड्डी यांनी ट्‌विटरवर सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या आगीमुळे परिसरामध्ये काळा धूर पसरला होता. त्यामुळे “एरो इंदिया’ शो बघायला आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी याच शोच्या उद्‌घाटनाच्या दिवशी हवाई दलाच्या सूर्यकिरण या दोन विमानांचा अपघात झाला होता. त्यापैकी एका विमानातील पायलटचा मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण या अपघातात जखमी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)