फटाके आणि आरोग्य (भाग 2)

फटाके आणि आरोग्य (भाग 1)

फटाक्‍यांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणाबरोबरच धुळीच्या कणांची वाढती पातळी धोकादायक ठरत आहे. हे धुळीचे कण नाका-तोंडात जाऊन ते शरीरात प्रवेश करतात. यामुळे अनेक रोग उद्‌भवू शकतात. वातावरणातील या धुळीच्या कणांचा केवळ मनुष्यावरच नाही तर वनस्पती आणि प्राणी यांच्यावरही वाईट परिणाम होतो.

पक्ष्यांचे आवाजामुळे स्थलांतर करणे, संरक्षणासाठी मानवी वस्तीत शिरणे असे प्रकार प्राणी करतात. तर वनस्पतींच्या वाढीवरही या धुलिकणांचा विपरीत परिणाम होतो. कोणत्याही प्रकारच्या फटाक्‍यामुळे प्रदूषण होते. याशिवाय फटाक्‍यांमुळे होणारा कचरा हा सगळीकडे पसरला जातो. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यामुळे तो तसाच रस्त्यावर पडून राहतो. या कचऱ्यात असणारे प्लॅस्टिक, पुठ्ठे, शोभेची दारू असे अविघटनशील पदार्थ सर्वत्र पसरल्यामुळे त्यामार्फत विषारी घटक पसरतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापेक्षाही गंभीर म्हणजे काही फटाके हे अर्धवट फुटलेल्या स्थितीत असतात. ते कधीही फूटू शकतात, तेव्हा रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा निष्काळजीपणामुळे फटाक्‍यांच्या दुकानांना आग लागल्याची वृत्तेही आपण ऐकतो. यामध्ये भरपूर प्रमाणात नुकसान होते तसेच जीवही जातो.

बऱ्याचदा फटाके फोडत असताना काही जणांना फाजील धाडस दाखविण्याची हौस असते. हातात फटाका ठेवून उडवणे, फटाक्‍यावर काही गोष्टी ठेवून ते उडवणे, बाटलीत अथवा तत्सम वस्तूंमध्ये फटाका लावणे यांसारख्या अनेक प्रकरणांमध्येही लहान मुलांबरोबरच कितीतरी जण जखमी झाल्याच्या बातम्या आपण दरवर्षी पाहतो.

लक्ष्मी बॉंब, ऍटम बॉंब यासारख्या फटाक्‍यांवर देवी-देवतांची चित्रे असलेले कागद लावलेले असतात. फटाका उडाल्यानंतर हे चित्रे असलेल्या कागदांच्या चिंध्या होऊन ते सर्वत्र विखुरतात. रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी त्यावर पाय देऊन जातात. अशा वेळी आपण देवदेवतांचा अपमान करतो हे कोणाच्याही ध्यानात येत नाही.

सद्यपरिस्थीतीत देश अनेक सामाजिक, आर्थिक परिस्थितींचा सामना करत आहे. उपासमार, कुपोषण, बेरोजगारी, दुष्काळ यामुळे देशातील जवळजवळ निम्मी जनता ही दररोज उपाशीपोटी झोपते. त्यांच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्याइतकेही पैसे नसतात असे असताना केवळ काही काळाच्या आनंदासाठी सण-उत्सव साजरे करण्यासाठी लाखो पैसे फटाक्‍यांवर उडवले जातात हा एक खूप मोठा विराधाभास आहे.

भारताचे सुजाण नागरिक या नात्याने सर्वांनीच हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत. या बदलाची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे. तरच हळूहळू जग बदलू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)