फटाके आणि आरोग्य (भाग 1)

फटाक्‍यांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणाबरोबरच धुळीच्या कणांची वाढती पातळी धोकादायक ठरत आहे. हे धुळीचे कण नाका-तोंडात जाऊन ते शरीरात प्रवेश करतात. यामुळे अनेक रोग उद्‌भवू शकतात. वातावरणातील या धुळीच्या कणांचा केवळ मनुष्यावरच नाही तर वनस्पती आणि प्राणी यांच्यावरही वाईट परिणाम होतो.

दिवाळीच्या काळात फटाक्‍यांमुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच वायूप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. सामान्यत: वायू प्रदूषणाच्या पातळीत आधीच वाढ झालेली आहे. फटाक्‍याच्या धूरामधून हवेत मिसळणारे कार्बन डायऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्‍साईड, सल्फर डायऑक्‍साईड यांसारखे विषारी वायू हवा दूषित करतात. दिवसभरातील वातावरणाच्या बदलामुळे, उष्णतेमुळे या वायुंवर रासायनिक प्रक्रिया होत असतात. याचे निसर्गावर, वातावरणावर आणि त्याचप्रमाणे मानवी आरोग्यावरही वाईट परिणाम होतात.

नंदाचा, उत्साहाचा, दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी. वर्षभर लहान-मोठे असे सर्वजण या सणाची आतुरतेने वाट पाहात असतात. झगमगाट, चकमकाट, स्वादिष्ट मिठायांची रेलचेल, दिवाळी आल्याची चाहूल देतात. संपन्नतेची एकमेकांत जणू चढाईच लागते आणि प्रत्येकजण आपले घर सुशोभित करण्यात मग्न असतो. पणत्यांची मंद आरास, अनेकविध प्रकारचे आकाशकंदील, लाईटच्या चमचमणाऱ्या माळा शहर उजळवून टाकतात. घरापुढे अंगण सारवलेले आहे. पणत्या शांतपणे तेवत प्रकाश देत आहेत. सारवलेल्या अंगणात सुंदरशी रांगोळी रेखाटली आहे. अंगणात एक चांदणीचा आकाशकंदील आहे. सनईचा सुर कानी पडत आहे. तेलाने मालीश करून गरम पाण्याने आंघोळी होत आहेत. देवाला नैवेद्य दाखवून घरोघरी आपल्या फराळाची ताटे पोहोचविली जात आहेत. अशी साधारणत: तुमच्या आमच्या लहानपणीची दिवाळी.

आताची दिवाळी म्हणजे सुरू होतेच फटाक्‍यांपासून आणि संपतेही फटाक्‍यांनीच. भल्या पहाटेपासून कर्णकर्कश आवाज घरावर जणू आदळत असतात. कागद, शोभेची दारू, फटाक्‍यांचे तुकडे यांचा कचरा रस्त्यांवर साचलेला असतो. या सगळ्यात मात्र लाखो रुपयांचा चुराडा होतो. तो ही अगदी क्षणभराच्या आनंदासाठी.तसेही सध्या ध्वनी प्रदूषणाबरोबरच वायू प्रदूषणानेही आपली पातळी ओलांडली आहे. त्यात फटाक्‍यांच्या आवाजाची भर पडत आहे. हल्ली फटाके वाजविण्यासाठी कोणतेही साधे कारण पुरेसे असते. निवडणुकांचा निकाल असो, लग्नाची वरात असो, गणपती-देवीची मिरवणूक असो किंवा गल्लीतील एखाद्या पुढाऱ्याचा वाढदिवस फटाक्‍याला दुसरा पर्यायच नाही. त्या कर्णकर्कश आवाजांनी कानठळ्या बसतात.

आजूबाजूच्या वृद्ध लोकांना, लहान बाळांना, दवाखान्यात असणाऱ्या रुग्णांना, शाळेतील विद्यार्थ्यांना या फटाक्‍याच्या आवाजाचा खूप त्रास होतो याकडे कोणाचे लक्षही नसते. आनंदाच्या, उत्साहाच्या भरात या गोष्टी आपल्या लक्षातच येत नाहीत. इतर प्रसंगी वाजवण्यात येणाऱ्या फटाक्‍यांपेक्षा दिवाळीत वाजवण्यात येणाऱ्या फटाक्‍यांची संख्या जास्त असते.
दिवाळीच्या काळात फटाक्‍यांमुळे ध्वनी प्रदूषणाबरोबरच वायू प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. सामान्यत: वायू प्रदूषणाच्या पातळीत आधीच वाढ झालेली आहे. फटाक्‍याच्या धुरामधून हवेत मिसळणारे कार्बन डायऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्‍साईड, सल्फर डायऑक्‍साईड यांसारखे विषारी वायू हवा दूषित करतात.

दिवसभरातील वातावरणाच्या बदलामुळे, उष्णतेमुळे या वायूंवर रासायनिक प्रक्रिया होत असतात. याचे निसर्गावर, वातावरणावर आणि त्याचप्रमाणे मानवी आरोग्यावरही वाईट परिणाम होतात. संध्याकाळपासून पहाटेपर्यंत वातावरणाचे तपमान कमी असल्याने हवेत मिसळलेले हे धुलिकण जड होतात आणि सकाळपर्यंत त्यांचा एक दाट थर जमिनीलगत साठून राहतो. हे कण डोळ्यात गेले असता त्या कणातील सल्फर डायऑक्‍साईड आणि डोळ्यातील पाण्यात असणारे नायट्रस ऑक्‍साईड यांची क्रिया होऊन आम्ल (ऍसिड) तयार होते. त्यामुळे डोळे चरचर करतात, त्यांची आग होते. या वायूमुळे दम्याच्या रुग्णांना श्‍वसनाचा त्रास होतो. यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनू लागते.

फटाके आणि आरोग्य (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)