अंधेरीतील कामगार रुग्णालयाला भीषण आग; 6 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

मुंबई: अंधेरीतील कामगार रुग्णालय (ईएसआयसीला) आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास आग आगली आहे. रुग्णालय इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर ही आग लागली. यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 109 जण जखमी झाले आहेत.
आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले होते. त्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. सुदैवाने रुग्णांच्या भेटण्याची वेळ असताना ही घटना घडली. त्यामुळे नातेवाईकांनी रुग्णांना घेऊन एकच धावाधाव सुरू केली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टॅंक घटनास्थळी पोहोचले.

अग्निशमन दलाने शिडी आणि दोर लावून अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात आले. तसेच टेरेसवरून देखील दोरखंडाच्या सहाय्याने आगीत अडकलेल्यांना इमारतीबाहेर काढण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र, या बचाव कार्यादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर इतर पाच जणांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आगीत अनेक जण जखमी झाल्याने मृतकांचा आकडा वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्‍यात आली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीनंतर सर्व रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. वेळीच रुग्णालयाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावाची कारवाई केल्यामुळे 109 जणांना वाचवण्यात यश आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)