सुरत अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई

सुरत – गुजरात राज्यातील सुरतमधील तक्षशिला नावाच्या एका इमारतीला भीषण आगीप्रकरणी सध्या पोलीस आणि प्रशासनाने दोषींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांनी कोचिंग क्लासचे मालक यांना अटक केली असून, त्याच बरोबर अग्निशनम दलाच्या दोन अधिकाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. या अग्नितांडवात २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर २० जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांच्या माहितीनुसार, राज्यातील तात्काळ सर्व ट्युशन क्लासेस बंद करण्यात आले आहेत. अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घेतल्यानंतरच क्लासेस पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच गुजरात सरकारने अहमदाबाद, सूरत, राजकोट, वड़ोदरामधील कोचिंग क्लासेसचे सेफ्टी ऑडिट पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)