ताज हॉटेलजवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग; एकाचा मृत्यू दोन जखमी

मुंबई : मुंबईच्या कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून आगीमध्ये एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ताजमहाल हॉटेलजवळ असलेल्या या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला साधारण दुपारी १२.३०च्या सुमारास आग लागली होती. आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मोठ्या शर्थीने जवानांनी आग आटोक्यात आणली. तसेच या मजल्यावरून १४ रहिवाश्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. आग नक्की कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)