‘लवरात्री’ सलमानला भोवणार?

बॉलिवूडचा दबंग ‘खान’ सलमान पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत. यावेळी सलमान याच्या ‘बॅनर’ खाली रिलीज होणारा ‘लवरात्री’ हा चित्रपट त्याच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. याविषयी सविस्तर वृत्त असे की सलमान खान याच्या बॅनर खाली रिलीज होणाऱ्या ‘लवरात्री’ या चित्रपटाच्या शीर्षकामुळे ‘हिंदूंच्या’ भावना दुखावल्याचा आरोप करत वकील सुधीर ओझा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याचिकेमध्ये या चित्रपटाचे शीर्षक अश्लीलतेला प्रोत्साहक असून, त्यामुळे हिंदू सणाची बदनामी होत असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान आता याप्रकरणी मुझफ्फरपूरच्या न्यायालयाने सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे सलमान भोवती कायद्याचा फास पुन्हा एकदा आवळला जाण्याची चिन्हे आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)