बोटे मोडण्याची सवय घातकच….

आपल्यापैकी अनेकांना हाताची बोटे मोडून आवाज काढण्याची सवय असेल. काही लोकांना कंटाळा आला किंवा करण्यासारखे काही काम नसेल, तर ते बोटे मोडतात. तर काही लोक बोटांच्या हाडाच्या जॉईंटमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो असे मानतात. काही लोक असे ठरावीक वेळेनंतर सारखे असे करतात. तुम्ही असे करण्यामागे कोणताही उद्देश असो, पण काय हे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे का, असे केल्यामुळे नुकसान होते?

बोटे मोडणे सामान्य आहे ?

तुम्ही दिवसभर आपल्या बोटे मोडण्याच्या सवयीकडे लक्ष सुद्धा देत नसाल. तुमच्यासाठी ही एक सवय झाली असेल. ज्यामुळे तुमचे या सवयीकडे लक्षही जात नसेल. पण, ही सवय तुमच्या हाडांसाठी सामान्य आहे का? आपण बोटे मोडतो तेव्हा त्याचा आवाज का येतो आणि असे करण्यामुळे आपल्या आरोग्यावर किती प्रभाव पडतो चला पाहूया.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बोटे मोडल्यावर आवाज का येतो ?

विज्ञानाच्या अनुसार बोटांमध्ये किंवा हाडांच्या जोडामध्ये एक खास प्रकारचा द्रवपदार्थ असतो. ज्याला श्‍लेष द्रव असे म्हणतात. हे द्रव आपल्या हाडांना खडबडीत होण्यापासून आणि घर्षणापासून वाचवते. तुम्ही असे म्हणू शकता की, हे द्रव हाडांच्या जोडामध्ये ग्रीसचे काम करते. या लिक्विडमध्ये असलेला गॅस हाडांमध्ये बुडबुडे बनवतो.

बोटे मोडण्याचा मोठा आवाज कसा येतो ?

जेव्हा आपण बोटे ओढतो, तेव्हा हे बुडबुडे फुटतात. ज्यामुळे बोटे मोडण्याचा आवाज येतो. एकदा बोटे मोडल्यावर हाडांच्या जोडामध्ये असलेले हे बुडबुडे फुटल्यानंतर पुन्हा तयार होण्यास 15 ते 30 मिनिटे लागतात. त्यामुळे तुम्ही पाहिले असेल की, एकदा बोटे मोडल्यावर पुन्हा लगेच बोटे मोडली तर आवाज येत नाही.

आपल्या हाडांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे

तज्ज्ञांच्या मते हे लिक्विड आपल्या हाडांच्या हालचालीसाठी अत्यंत आवश्‍यक आहे. जर हे कमी झाले किंवा संपले तर हाडे एकमेकांना घासल्यामुळे जोडांमध्ये वेदना सुरू होतात.

तुमच्यासाठी करू शकतो अनेक समस्या उत्पन्न

तसे पाहिले तर, अनेक शोधांच्या अनुसार बोटे मोडल्यामुळे या लिक्विडमध्ये कमतरता येणे, सांध्यामध्ये वेदना या सर्वाशी काही संबंध नाही. पण तज्ज्ञ असे मानतात की, बोटे मोडणे तुमच्या हाडांसाठी चांगले नसते. त्याचसोबत जर तुम्ही सारखे सारखे सांध्यांना असे ओढले किंवा त्यावर ताण दिला, तर हाडामध्ये गॅप येऊ शकतो.
बोटे मोडल्यामुळे सांध्यांना हानी पोहोचते. त्यामुळे ही सवय सोडण्याचा प्रयत्न करा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)