राजनैतिक तोडगा शोधा – ब्रिटनचे आवाहन 

लंडन  – भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी आपसातील तणावाबाबत राजनैतिक तोडगा काढून संबंध सुरळीत करावेत आणि त्या प्रदेशामध्ये शांतता कायम राखावी असे आवाहन ब्रिटनने दोन्ही देशांना केले आहे. हवाई हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांमध्ये नव्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना त्यांनी हे आवाहन केले आहे.

ब्रिटनचे विदेश सचिव जर्मी हंट यांनी आज भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांच्याशीही त्यांनी फोन वरून संपर्क साधला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. या प्रदेशातील दहशतवादी कारवायांमुळे शांततेला बाधा पोहचत आहे ही चिंतेची बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांनी आपसातील सहकार्य वाढवण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्‍त केली. त्यासाठी आवश्‍यक ती मदत देण्याची ग्वाहीही ब्रिटनने दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)